भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं

kelen nahin manin taya ghade tyag | ubagen udveg nahin chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥ तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥३॥