भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें

kela angikar pandharichya deven | atan kay kariti kal mashak manaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥ म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥