भजनी मालिका
← भजनांकडे परत

केल सती उपकार । दिधलें घर दावुनी

kel sati upakar | didhalen ghar davuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
केल सती उपकार । दिधलें घर दावुनी ॥१॥ नये ध्यानीं मनीं लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥ संकल्पाचें तोंडिलें मूळ । आलें समुळ प्रत्यया ॥३॥ एका जनार्दनीं कृपावंत । होती संत सारखे ॥४॥