भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं

kayik vachik manasik bhav | thevin ha nihsandeh devapayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥ काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥ आशा मनीषा तृष्णा पडतील वोस । धरितां उल्हास रामनामीं ॥३॥ एका जनार्दनीं विश्वास हो मनीं । प्रत्यक्ष पुराणां बोलिलें तें ॥४॥