भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें

kay vrundavan makhiyelen gulen | kay jiren kalen upacharilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥ तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥