भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें

kay vinavaven konen to nivad | kelen majhya kod vachanachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥ आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥ बहुत करुणा केलेंसे भाषन । एक ही वचन नाहीं आलें ॥२॥ माझी कांहीं सेवा होईल पावली । निंश्चिती मानिली होती ऐसी ॥३॥ तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखें चि ॥४॥