भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं

kay sharirapen kam | krupa sadhavaya prem | uchitache dharma | bhaga ale te karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥ देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥ सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोग सांभाळीं ॥२॥ फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥३॥