भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती

kay sangon ata santanche upakar | maj nirantar jagaviti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥ तुका म्हणे वत्स धेनुवेचે चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥