भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले

kay karun ata dharuniya bhid | nihshank he tond vajavile

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥ नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ध्रु.॥ आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनियां ॥२॥ तुका म्हणे मना समर्थासी गाठी । घालावी हे मांडी थापटूनी ॥३॥