भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों

kay karaven myan kele te vichar | ghadel sachar kay pahon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥ काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥२॥ आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥३॥ तुका म्हणे आम्हां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥४॥