भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां

kay jalen nenon majhiya kapala | na dekhije dolan mul yetan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥ बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठूर पाहिजे ॥२॥ पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥ तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥४॥