भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौतुकें आनंदे लोटल कांही काळ

kautuken anande lotal kanhi kal

रचनाकार: संत बंका · अभंग
कौतुकें आनंदे लोटल कांही काळ । तों आलें असे फळ प्रसादाचे ॥१॥ चोखीयाची कांता जालीसे गर्भीण । लागलासे पूर्ण नववा मास ॥२॥ स्वभावे विनंती करी पतीलागीं । घरीं नाही सामोग्री कैसी करूं ॥३॥ वंका म्हणे ऐसी ऐकोनियां मात । निघाला त्वरित बहिणी घरा ॥४॥