भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते

kaudikaudisathi phoditati shir | kadhuni rudhir malang te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥