भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे

kasturichi uti tilak lallatin | sanvalan jagajethi ubha vite

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥ नाम हें चांगलें रुप हें चांगलें । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥ आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशनें मुक्तिं पातकीयांसी ॥३॥ एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तों गोविंद विटेवरी ॥४॥