भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे

kasayasi mudha kariti sansar | pudhen to aghor thor ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे ॥१॥ बळेंचि कां रे नागवासी पाहतां । विषयभोग भोगितां दुःख बहु ॥२॥ पातकाची राशी हे तो कन्यापुत्र । तूं कां रे पवित्र त्यांसी म्हणसी ॥३॥ एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी पाडितोसी ॥४॥