भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया गा मज घातिलें संसारा

kasaya ga maj ghatilen sansara

रचनाकार: संत बंका · अभंग
कासया गा मज घातिलें संसारा । पाडिलें विसरा तुमच्या नामा ॥१॥ कोठवरी हांव करितों दिवसराती । गुंतलोंसे भ्रांती माया मोहें ॥२॥ न कळे उकला करितां येरझारी । माझा मीच वैरी झालों दिसे ॥३॥ वंका म्हणे सुख संताचे संगती । ती मज विश्रांती द्यावी देवा ॥४॥