भजनी मालिका
← भजनांकडे परत

कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण

karya chi karan | trushna pavavite sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥ काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥ तुका म्हणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥