भजनी मालिका
← भजनों पर वापस

कर जोडूनि विनवितो तुम्हा

kar joduni vinavito tumha

रचनाकार: अज्ञात · अभंग #वासुदेव
कर जोडूनि विनवितो तुम्हा । नका करू संसारश्रमा। नका गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ।।१।। रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।। धृ. ।। नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्यामध्ये दुःख यातना। तुम्ही आठवा मधुसूदना ।।२।। नलगे तीर्थांचे भ्रमण। नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ।।३।। हेचि माझी विनवणी। जोडोनिया कर दोन्ही। शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ।।४।।