भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां

kanta hi abala nahin tisi dnyan | majhen vrudhdapan jahalen atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥ नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥ येणें तो मनीं धरिला विठ्ठल । याजकडे नाहीं बोल प्रारब्धेंचि ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥