भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी

kanhoba naval sangaton goshti | ek vruksha drushti dekhila tayavari srushti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥ वृक्षाग्री नाहीं मूळ वर शेंडा नाहीं सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥ एका जनार्दनींक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥