भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे

kanhin na karun anik an | vache gun gaun tumache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे ॥१॥ पाहुं डोळेभरी मुख । तेणें सुख इंद्रियां ॥२॥ न करी कोना ताडातोडी । आहे खोडी दूर करुं ॥३॥ एका जनार्दनीं प्रमाण । वाचे नारायण आठवुं ॥४॥