भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी

kanhin bolilon bobaden | mayabapa tumhampudhen | salagi laden koden | maj kshama karavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥ काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥ घडे अवज्ञ सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुह्मासी ॥२॥ तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥