भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख

kamen nelen chitta nedi avalokun mukh

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥ प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥ येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥