भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती

kaliya nathuni ala vari | pail hari dakhaviti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥ रूपा भिन्न पालट झाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥ आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥