भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळें काय वायां जातु । तेणें होय आयुष्य अंतु

kalen kay vayan jatu | tenen hoy ayushya antu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळें काय वायां जातु । तेणें होय आयुष्य अंतु ॥१। जाणोनियां रक्षी कोण । सोडी देहाचा अभिमान ॥२॥ अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनीं दास्य करी ॥३॥