भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना

kalen grasilenk sakal | urala jaun nedi vel | ghatika ani pal | ramanam smare jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥ अरे आलेती संसारा । कांहीं ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥ करुणा नाहीं तया यमासी । काढिती वोढिती जिवासी । भोगविती चौर्‍यांशी । यातना ते दुस्तर ॥३॥ म्हणोनी येतसे करुणा । शरण एका जनार्दना । वाचें रामनाम म्हणा । मग सुख पावाल ॥४॥