भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें

kalanen grasilen savadhan vha re | sodavan kara re harinamen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥ आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती यमदंड ॥२॥ उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढें काहीं ॥३॥ एका जनार्दनीं तूं कां रे अंधळा । देखतोसी डोळां सुख दुःख ॥४॥