भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां

kalachiya satta te nahin ghatika | pandharinayaka athavitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥ याकारणें माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥२॥ तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥३॥