भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाची ती ऐशी सत्ता । भरतां न पुरे एक क्षण

kalachi ti aishi satta | bharatan na pure ek kshan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळाची ती ऐशी सत्ता । भरतां न पुरे एक क्षण ॥१॥ यांत कांहीं हित करा । राम स्मरा निशिदिनीं ॥२॥ नुमगे शेवट घडी येती । गुंतती तत्त्वतां देह आशा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करा सोडवणी देहाची ॥४॥