भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचे तो न चले बळ । करितां कल्लोळ कीर्तनीं

kalache to na chale bal | karitan kallol kirtanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळाचे तो न चले बळ । करितां कल्लोळ कीर्तनीं ॥१॥ शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनीं प्रीति धरावीं ॥२॥ सांगे शुक परिक्षिती । कीर्तनीं उद्धार पावती ॥३॥ एका अनन्य त्यांचा दास । धरतीं आस कीर्तनीं जे ॥४॥