भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचे आहारीं । पडसी शेवटीं निर्धारीं

kalache aharin | padasi shevatin nirdharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळाचे आहारीं । पडसी शेवटीं निर्धारीं ॥१॥ ऐसें असोनि ठाउक मना । परि न स्मरे रामराणा ॥२॥ गुंतले ते मायाजाळीं । न कळे गळीं लागती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वाचे न म्हणती नारायण ॥४॥