भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ आला रे जवळी । वाचे जपें नामावळी

kal ala re javali | vache japen namavali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळ आला रे जवळी । वाचे जपें नामावळी ॥१॥ अंतकाळीं जाण । तुज होईल बंधन ॥२॥ नको गुंतूं संसारा । चुकवी जन्ममरण फेरा ॥३॥ कोनी कोणाचे न सांगाती । अवघे सुखाचेच होती ॥४॥ एका जनार्दनीं शरण । कायावचामनें जाण ॥५॥