भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा

kaisa hoto krupavant | bahusant sangati | pusanen nahin yatikul | lagon vel nedava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥ ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥ दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न। अभिमान तो नाहीं अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥ आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ।तुका म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । ॥३॥