भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे

jyache garjatan pavade | kalikal payan pade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥ चिंतितां जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥ वैकुंठासी जावें । तुका म्हणे ज्याच्या नांवें ॥३॥