भजनी मालिका
← भजनांकडे परत

जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं

jon jon ghyava sos | majhe varin garbhavas | latikyacha dosh | adhik jade angesin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥ आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढेंचि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥ जागा झालेपणें । काय असावें स्वप्नें । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥ छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोईं गुडघे कोंपर ॥३॥