भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात

jodoniyan donhi hat | jagin janaviton mat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात ॥१॥ एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥ आवडीं सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥ ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥