भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे

jodoniyan dhan nashi veshya gharin | atithi aliya dvarin nahin mhane

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे ॥१॥ वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥ घरीं कोणी अभ्यागत आलिया मागता । धांवतोम सर्वथा श्वानासम ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा दुराचार । नरक अघोर भोगिताती ॥४॥