भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें

jodilen ten atan na sare saritan | jiv bali detan hata alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥ संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षेपे हें ॥ध्रु.॥ शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥२॥ बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥३॥ तुका म्हणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥