भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला

jo kanakabijen bhulavila | to gaye nache ude bhala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला ॥१॥ शुद्धि नाहीं पा देहाचीं । सैरावैरा बोले वाचे ॥२॥ देह अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥ ज्यासी विष चढलें गहन । तया करविती विष्ठापान ॥४॥ एका जनार्दनीं वर्म । हारपे तेणें कर्माकर्म ॥५॥