भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे

jo jo kal venchita kirtanin | ton ton sarthak janeken hotase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥ साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥ करी कीर्तनीं तूं वेग । तेणें संग तुटेल ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । उपाय सोपा कलीमाजीं ॥४॥