भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे

jo jaya chittin bhav | taisa taisa hoy dev | yethen sandehi dharanen na lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे ॥१॥ द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥ अशोक वनीं सीता । शुद्धि जातां हनुमंता । भावेंचि तत्त्वतां । कार्यसिद्धि ॥३॥ समरांगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोत्र देखोन । तेथेंचि जनार्दन । भावें गीता सांगे ॥४॥ ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासे वैकुंठ । एका जनार्दनीं नीट । विटे उभा राहिला ॥५॥