भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण

jivachen jivan amrutachi tanu | bramhand bhushanu narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥ गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥ भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥ तुका म्हणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥