भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा

jivabhav tyacha gela abhiman | mhanauni jan hanse kansa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥ सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥ जन वन हरी झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥ झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥ बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण झाले स्वयें रूप ॥५॥ रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव झाला ॥६॥