भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवा शिवा एकपण । तुमचा चरणांचे महिमान

jiva shiva ekapan | tumacha charananche mahiman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीवा शिवा एकपण । तुमचा चरणांचे महिमान ॥१॥ गेलें अज्ञान हारपोनी । लाविलें तें आपुलें ध्यानीं ॥२॥ कर्म धर्म पारुषले । अवघे जाहले परब्रह्मा ॥३॥ उगविली गोंवागुतीं । एका जनार्दनीं प्रचीती ॥४॥