भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावे यावरी

jikade jay tikade saven | atan yave yavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावे यावरी ॥१॥ माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजे धरा झणी । पायां हुनी वेगळे ॥२॥ तुका म्हणे आतां देवा । नका गोवायावरी ॥३॥