भजनी मालिका
← भजनांकडे परत

झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा

jhara lagala sukhacha | aisa mapari kaincha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥ जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥ जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥ तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥