भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालों परदेशी एकटा येकला

jhalon paradeshi ekata yekala

झालों परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥ आतां बुझावण करणें तुम्हांसी । मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥ मोकलितां तुम्ही कोण पुसे मज । थोरीव सहज बुडालीसे ॥३॥ कर्ममेळा म्हणे आतां दंडवत । करा माझें हित तुम्ही दिवा ॥४॥