भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक कांही देवा न लगे दुजें

jhaliya darshan karin mi seva | anik kanhi deva na lage dujen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक कांही देवा न लगे दुजें ॥१॥ प्रारब्धा अधीन अन्न अच्छादन । स्थिर करोनी मन ठेवी पायीं ॥ध्रु.॥ येगा येगा येगा कृपाळूवा हरी । निववी अभ्यंतरी देऊनि भेटी ॥२॥ आसावले मन जीवनाचे ओढी । नामी रूपीं गोडी लावियेली ॥३॥ काय तुम्हांपाशी नाही भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥ काय लोखंडाचे पाहे गणु दोष । सीवोनि परीस सोने करी ॥५॥ तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुले करावे ब्रीद साच ॥६॥