भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई

jhali pakasiddhi vat pahe rakhumai | udak tapalen deran chikasa marduni pai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई ॥१॥ उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥ अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥ सावरीली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥ तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥