भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली होती काया । बहु मळीन देवराया

jhali hoti kaya | bahu malin devaraya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥ तुझ्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥ अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥ तुका म्हणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराई ॥३॥